Shehzada Trailer: ॲक्शनचा लागला तडका, आर्यनचा 'शहजादा' ट्रेलर रिलीज | पुढारी

Shehzada Trailer: ॲक्शनचा लागला तडका, आर्यनचा 'शहजादा' ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक आर्यन सध्या बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याने मागील वर्षी भूलभुलैयासारखा दमदार चित्रपट केलाय, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. यावर्षी कार्तिक आर्यन शहजादा घेऊन येत आहे. (Shehzada Trailer) काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता, ज्यामध्ये कार्तिकचा दमदार लूक पाहायला मिळाला होता. तेव्हापासून फॅन्स या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी शहजादाचा ट्रेलर रिलीज केला आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक ॲक्शनसोबत कॉमेडी करताना दिसत आहे. (Shehzada Trailer)

शहजादाचा ट्रेलर मनोरंजनने भरपूर आहे. यामध्ये ॲक्शन, ड्रामा आणि रोमान्स सर्वकाही पाहायला मिळेल. ट्रेलरची सुरुवात कार्तिकच्या ॲक्शनने सुरु होते. यामध्ये कृती सेनॉनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय, परेश रावलदेखील दिसणार असून त्यांनी कार्तिकच्या वडिलांची भूमिका साकारलीय.

ट्रेलरमध्ये एक मोठी हवेली दाखवण्यात आली आहे. तेव्हा कार्तिक आपल्या वडिलांना विचारतो की, बाबा मी बालपणापासून पाहतोय की, तुम्ही मला कधीही आत जाऊ देत नाही. त्यानंतर परेश रावल म्हणतात की, हा स्वर्ग आहे, येथेपर्यंत पोहोचण्यासाठी तुला खूप पुण्य करायला हवं किंवा मरायला हवं. गरिबीत दिवस काढणाऱ्या कार्तिक आर्यनला अचानक समजते की, ते त्याचे वडील नाहीत आणि तोच जिंदल परिवार आणि मोठ्या हवेलीचा शहजादा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Back to top button