कुर्ल्यात पालिका कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार | पुढारी

कुर्ल्यात पालिका कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार

कुर्ला; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील कुर्ला कपाडिया नगरमध्ये सोमवारी (दि.९) रात्री मुंबई पालिकेतील एका कंत्राटदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली. मुंबई मनपा एल विभाग कार्यालयातून रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी जाताना ही घटना घडली. सुरज प्रताप सिंह देवरा, (रा. दहिसर) असे कंत्राटदाराचे नाव असुन सुदैवाने ते सुखरुप आहेत.

कुर्ला कपाडिया नगर येथे दोघा अज्ञातांकडून कंत्राटदार सुरज यांच्यावर गोळीबार करण्यात आला. झाडण्यात आलेली गोळी त्यांच्या गाडीला लागल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढून थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना माहिती दिली. कंत्राट घेण्यादेण्यावरून हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button