Russia Ukraine War : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे 600 सैनिक ठार; रशियाचा दावा, युक्रेनचा इन्कार | पुढारी

Russia Ukraine War : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे 600 सैनिक ठार; रशियाचा दावा, युक्रेनचा इन्कार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे युक्रेनचे 600 सैनिक ठार झाले आहे, असा दावा रशियाने केला आहे. मात्र, युक्रेनने या दाव्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. तसेच युक्रेनने म्हटले आहे की, रशियाच्या हल्ल्यात केवळ नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी याविषयी माहिती दिली आहे. कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले की, त्यांच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या क्रॅमतोर्स्कमधील, 300 युक्रेनियन सैन्याच्या दोन बॅरेक्सला धडक दिली आणि त्यापैकी 600 ठार झाले.

Russia Ukraine War : रशियाच्या या दाव्याचा युक्रेनने स्पष्ट इन्कार केला. पूर्वेकडील युक्रेनच्या सैन्याचे प्रवक्ते, सेर्ही चेरेवती यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की क्रॅमटोर्स्कवरील रशियन हल्ल्यांमुळे केवळ नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि युक्रेनियन सैन्यावर परिणाम झाला नाही.

Russia Ukraine War : डोनेस्तक प्रादेशिक प्रशासनाने सांगितले की सात रशियन क्षेपणास्त्रांनी क्रॅमतोर्स्क आणि आणखी दोन क्षेपणास्त्रांनी कोस्त्यंतिनीव्हकाला धडक दिली, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यात म्हटले आहे की क्रॅमटोर्स्कमध्ये शैक्षणिक संस्था, औद्योगिक सुविधा आणि गॅरेजचे नुकसान झाले आहे आणि कोस्त्यंतिनीव्हका येथे औद्योगिक झोनला फटका बसला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रात्रीच्या व्हिडिओ संबोधनात म्हटले, “जगाने आज पुन्हा पाहिले की रशिया स्वतःच्या विधानांनी आघाडीच्या परिस्थितीकडे लक्ष वेधूनही खोटे बोलत आहे.”

Russia Ukraine War : ऑर्थोडॉक्स ख्रिसमस निमित्त दोन दिवसांचा युद्ध विराम

रशियाने शनिवारी ऑर्थोडॉक्स ख्रिसमस उत्सवाच्या अनुषंगाने दोन दिवसांचा युद्धविराम घोषित केला होता. मात्र, युक्रेनने रशियाच्या या युद्धविरामाला ढोंगीपणा म्हटले होते.

हे ही वाचा :

Maharashtra political crisis : देशात लोकशाही, न्यायव्यवस्था आहे की नाही?, सत्तासंघर्षाच्या खटल्यातून सिद्ध होईल – संजय राऊत

Nashik : सलग दुसऱ्या दिवशीही निफाडचा पारा ५ अंशावर, द्राक्षबागा धोक्यात

Back to top button