नेरळ-माथेरान ‘टॉय ट्रेन’ला प्रचंड प्रतिसाद; ३.४ लाख प्रवाशांना सेवा देऊन पार्सल सेवेत २.२४ कोटींची उलाढाल | पुढारी

नेरळ-माथेरान 'टॉय ट्रेन'ला प्रचंड प्रतिसाद; ३.४ लाख प्रवाशांना सेवा देऊन पार्सल सेवेत २.२४ कोटींची उलाढाल

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई, पुणे परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील काही पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे.

वर्ष २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला नेरळ-माथेरान ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न केले. नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळसा घालणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली.  या मार्गावरील सेवा २२ ऑक्‍टोंबर २०२२ रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. अमन लॉज ते माथेरान दरम्यानच्या शटल सेवा आधीच प्रवासी आणि पार्सल घेऊन जाणाऱ्या सेवेत होत्या. टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी  उत्‍स्‍फूर्त स्वागत केले आहे.

एकूण ३,०४,१९५ प्रवाशांना माथेरानचा प्रवास घडविण्यात आला असून त्यात एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीतील अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या २,७६,९७९ आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीतील नेरळ आणि माथेरान दरम्यानच्या २७,२१६ प्रवाशांचा समावेश आहे. एकूण नोंदणीकृत महसूल रु. २,२०,९०,०२० आहे. ज्यामध्ये अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठीचे रु.१,८६,६३,३४८/- आणि ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीसाठी माथेरान – नेरळ दरम्यान रु. ३४,२६,६७२/- या व्यतिरिक्त या विभागात एकूण १०,९८३ पॅकेजेसची पार्सल वाहतूक करण्यात आली आहे, ज्यातून ३,०४,३२५/- रुपयांचा महसूल नोंदवला गेला आहे.

अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत ७,६१८ पॅकेजेसचा समावेश आहे ज्यामधून रु.२,७९,८२३/- महसूल मिळाले असून ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत नेरळ आणि माथेरान दरम्यान आणि ३,३६५ पॅकेजेस मधून रु.२४,५०२/- महसूल मिळाला आहे. पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. मध्य रेल्वे हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करीत आहे. टॉय ट्रेनमधील प्रवास अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करतो.

हेही वाचा : 

Back to top button