डोंबिवलीत अवतरणार पुस्तकांची पंढरी; दोन लाख पुस्तकांचे होणार आदान प्रदान

डोंबिवलीत अवतरणार पुस्तकांची पंढरी; दोन लाख पुस्तकांचे होणार आदान प्रदान
Published on
Updated on

डोंबिवली, भाग्यश्री प्रधान आचार्य : डोंबिवलीत येत्या 20 जानेवारीला पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे पुस्तकाच्या आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आदान प्रदान सोहळ्यात बहुभाषिक पुस्तकांचा समावेश होणार असून, जवळपास नऊ दिवस डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडा संकुल येथे पुस्तकांची पंढरी अवतरणार आहे, अशी माहिती रविवारी सकाळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सर्व परिसराला यंदा ए पी जे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार असून, पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सोहळ्यातील  ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकाचे इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुंडलिक पै यांनी सांगितले.

साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर डोंबिवलीचे लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. इतकेच नव्हे तर शहरातील सुमारे ४० साहित्यिक मंडळी या उपक्रमात सहभागी असून त्यांचे सर्व साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.

दहा दिवसांत सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार , प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथ दिंडी

यानिमित्ताने शहरातील ३०हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढणार आहेत. त्यात सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता टिळक चौक सर्वेश हॉल फडके पथ गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.

कॉफी टेबल बुक

यानिमित्त फ्रेंड्स लायब्ररी एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, आझादी के ७५ साल या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news