घाटकोपरमध्ये पोलिसांचे दंगल रोखण्याचे ‘मॉकड्रिल’ | पुढारी

घाटकोपरमध्ये पोलिसांचे दंगल रोखण्याचे 'मॉकड्रिल'

घाटकोपर, पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई येथे दंगल सदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक मुंबई पोलिसांनी आज (दि. ७ ) रोजी घाटकोपर येथे केले. परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ सातमधील सर्व अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनी एकत्र येत घाटकोपर च्या आचार्य अत्रे मैदानात ही मॉकड्रिल पार पाडली.

यामध्ये दगडफेक, रस्ता रोखणे, दोन गटात हानामारी, आग लावणे, जखमी नागरिक अशा आणीबाणीच्‍या परस्‍थितीला कसे हाताळावे,  याबाबत अधिकाऱ्यांनी पोलिसांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले. अशा प्रात्यक्षिकामधून पोलिसांचे आत्मबल वाढणे, सराव होणे आणि नागरिकांमध्येसुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले असल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button