Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सावध सुरुवात, दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर

Stock Market Today : अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.५) तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर काहीवेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर पातळीवर आले. जागतिक सकारात्मक संकेत सकारात्मक आहेत. त्यात अमेरिकेची फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीची गती कमी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ९० अंकांनी वाढला होता. त्यानंतर तो स्थिर पातळीवर आला आहे. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स किरकोळ अंकांच्या घसरणीसह ६०,५३३ अंकांवर तर निफ्टी १८,०३२ वर व्यवहार करत होता. बजाज फायनान्सचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच बजाज फिनसर्व्ह, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि., मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्समध्येदेखील घसरण झाली आहे.

बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्याने घसरले होते. यामुळे गुंतवणूकदारांना २.७ लाख कोटींचा फटका बसला होता.

अमेरिका, आशियातील बाजारात तेजी

अमेरिकेतील शेअर बाजारात २ दिवसांच्या घसरणीला ब्रेक मिळाला आहे. येथील प्रमुख निर्देशांक S&P 500, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल आणि नॅस्डॅक कंपोझिट वधारुन बंद झाले. अमेरिका बाजारातील तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. MSCI चा जपानबाहेरील आशिया पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक जवळपास एक टक्क्याने वाढला आहे. जपानचा निक्केई ०.१ टक्क्याने वधारला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग १.८ टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.८ टक्क्याने वाढून व्यवहार करत आहे. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button