धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, फेसबुक पोस्ट करत दिली तब्येतीची माहिती | पुढारी

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, फेसबुक पोस्ट करत दिली तब्येतीची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळी येथे मंगळवारी रात्री अपघात झाला. यामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या अपघातनंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर मुंडे यांनी आपल्या या अपघाताची माहिती फेसबुकवर दिली आहे.

आमदार धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.”

हेही वाचा :

Back to top button