Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची स्थिर सुरुवात, ‘डी मार्ट’ला फटका, इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीत | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची स्थिर सुरुवात, 'डी मार्ट'ला फटका, इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीत

Stock Market Today : २०२३ वर्षाच्या सुरुवातीला जगभरातील बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी (दि.४) स्थिर सुरुवात केली. सेन्सेक्स ६१,२०० वर तर निफ्टी १८,२०० वर खुला झाला आहे. DMart चा शेअर २ टक्क्यांनी घसरला आहे, तर इंडसइंड बँकेचा शेअर २ टक्क्यांनी वधारला आहे. काल मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला होता.

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदरवाढीच्या मार्गावर असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहे. यामुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक घसरून बंद झाले. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात बुधवारी संमिश्र वातावरण राहिले. आशिया-पॅसिफिकमधील MSCI चा निर्देशांक ०.९१ टक्के वाढला. हा निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी तेजीत राहिला आहे. २०२२ मध्ये हा निर्देशांक २० टक्क्यांनी घसरला होता.

दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्की निर्देशांक १.१२ टक्क्यांनी घसरला. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ५३.५ अंकांनी म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी घसरून १८,२५२ वर आहे. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button