गुंतवणूक : देशाच्या विकासाचे भागीदार Consumption Funds!

गुंतवणूक : देशाच्या विकासाचे भागीदार Consumption Funds!
Published on
Updated on

भारतामध्ये कोणकोणते Consumption stocks आहेत? त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने 12 जुलै 2011 रोजी एक इंडेक्स सुरू केला – Nifty India Consumption Index या इंडेक्समध्ये ज्या दहा सेक्टर्सचा समावेश केला आहे, ती सेक्टर्स पाहता Consumption संकल्पना किती व्यापक आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

वरील दहा सेक्टर्समधील सर्वात मोठ्या 30 कंपन्यांचा समोवश या इंडेक्समध्ये केला गेला आहे. जगातील इतर अनेक देश मंदीला सामोरे जात असताना भारताला मंदीची तीव्रता कमी जाणवते याचे कारण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये Private Consumption चे असणारे योगदान! भारताच्या Nominal GDP शी Private Consumption चे प्रमाण हे नेहमीच 60 टक्क्यांच्यावर राहिलले आहे. याचा दुसरा महत्त्वाचा सुपरिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे आयातीवरचे अवलंबन कमी होते.

भारताच्या GDP शी इतके मोठे प्रमाण असल्यामुळे या Consumption कंपन्या नेहमीच फंडामेंटली मजबूत असतात. शिवाय भारताचा अवाढव्य विस्तार आणि त्यातील ग्रामीण भागाचे प्रमाण पाहता या कंपन्यांच्या द़ृष्टीने विस्ताराला प्रचंड वाव आहे. त्यामुळे हे Consumption stocks एकाच वेळी Fundamentally stable असतात आणि शिवाय Growth Stocks ही असतात. या कंपन्या Debt-free असतात, त्यांचे Margins चे आकडे मोठे असतात. Cash-Flow उत्तम असतात. आणि या सर्व गोष्टींमुळे मार्केटमधील सुरक्षित शेअर्स म्हणून ते ओळखले जातात. Nifty India Consumption Index मधील Top – 10 कंपन्यांची खालील यादी पाहिल्यास तुमची खात्री पटेल.

आपण यापूर्वी Sectoral आणि The matic फंडांची चर्चा केली आहे. Sectoral हे अधिक जोखमीचे असतात कारण एकाच सेक्टरमधील कंपन्यांमध्ये सर्व गुंतवणूक होत असल्यामुळे त्यामध्ये Concentration Risk अधिक असते. म्हणजे Diversification हे जे म्युच्युअल फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, त्याचाच इथे अभाव असतो. परंतु Thematic फंडस् हे सेक्टरल फंडापेक्षा अधिक व्यापक असतात. आता Consumption या थीमचाच विचार केला तर त्यामध्ये किती सेक्टर्सचा अंतर्भाव होतो, हे आपण वर पाहिलेच. त्यामुळे इतर सेक्टरला किंवा Thematic फंडाच्या तुनलेत Consumption फंडस् हे नेहमीच थोडे अधिक सुरक्षित आणि त्यांच्या परताव्याचा इतिहास पाहिला तर अधिक आकर्षक असतात.

वैविध्यतेच्या द़ृष्टिकोनातून पाहिल्यास आर्थिक द़ृष्ट्या सक्षम असणार्‍या गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीचा काही भाग Consumption फंडामध्ये अवश्य गुंतवावा. परंतु Low Risk Profile असणार्‍या गुंतवणूकदारांनी देखील पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी नजरेसमोर ठेवून त्यांच्या गुंतवणुकीचा अल्प भाग या फंडामध्ये गुंतवल्यास ते निराश होणार नाहीत हे नक्की!

-भरत साळोखे

(लेखक अक्षय प्रॉफीट अ‍ॅण्ड वेल्थ प्रा.लि.चे डायरेक्टर व अ‍ॅम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news