Stock Market Updates | सलग दुसऱ्या दिवशी तेजी; गुंतवणुकादारांना २.६ लाख कोटींचा लाभ

Stock Market Updates | सलग दुसऱ्या दिवशी तेजी; गुंतवणुकादारांना २.६ लाख कोटींचा लाभ

Stock Market Updates : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी (दि.२७) सलग दुसऱ्या दिवशी तेजीत व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी वाढून ६०,८६० वर गेला होता. तर निफ्टी १८ हजारांवर पोहोचला होता. पण त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास काहीवेळ दोन्ही निर्देशांकांत घसरण पहायला मिळाली. या घसरणीनंतर लगेच सावरत पुन्हा दोन्ही निर्देशांकांनी तेजीत व्यवहार केला. सेन्सेक्स ३६१ अंकांनी वाढून ६०,९२७ वर तर निफ्टी ११७ अंकांनी वाढून १८,१३२ वर बंद झाला.

शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात तेजीचे चित्र राहिले. सन्सेक्स ३६१ पॉईंट किंवा ०.६० टक्के इतके वर राहिले तर निफ्टी ५० निर्देशांक १८,१३२.३० म्हणजे ११८ पॉईंटने वाढला होता. बाँबे स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी केलेल्या कंपन्याचे बाजारातील मूल्य २७७.९ लाख कोटींवरून २८०.५ लाख कोटींवर पोहोचले आहे. म्हणजे एकाच सत्रात गुंतवणुकदार २.६ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.

हे शेअर्स आघाडीवर…

आजच्या टॉप गेनर्समध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टायटन, एशियन पेंट्स, मारुती, आयसीसीआय बँक आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होता. तर आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल हे पिछाडीवर राहिले.

निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांची सकारात्मक वाटचाल…

निफ्टीच्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक वाटचाल केली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक १.८२ टक्क्यांनी वधारला. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० अनुक्रमे १.०८ टक्क्याने आणि १.४५ टक्क्याने वाढले. निफ्टी ५० पैकी ३६ घटकांनी नफा नोंदवला. जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स २.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सुमारे २ वाढून २,१२२ वर पोहोचले.

आजच्या व्यवहारात मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी बँक आणि निफ्टी आयटी निर्देशांक अर्ध्या टक्क्यांनी वाढला. ऑटो इंडेक्स अर्ध्या टक्‍क्‍यांहून अधिक तर मेटल आणि पीएसयू बँक इंडेक्स १ टक्‍क्‍यांनी वाढला. फार्मा, रियल्टी, एफएमसीजीसह इतर निर्देशांकही मजबूत झाले. (Stock Market Updates)

चीनच्या 'या' निर्णयामुळे आशियाई बाजारात तेजी

चीनने परदेशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे आशियाई शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक वगळता आशिया-पॅसिफिक बाजारांतील निर्देशांकांनी मंगळवारी हिरव्या रंगात व्यवहार केला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी खाली आला. पण जपानच्या निक्केई २२५ आणि शांघाय कंपोझिटमध्ये प्रत्येकी ०.४ टक्क्यांची वाढ दिसून आली, तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.४९ टक्क्यांनी वाढला.

एनएसईवरील डेटानुसार, सोमवारी (दि.२६) परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ४९७.६५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,२८५.७४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news