मुंबई ; पुढारी वृत्तसेवा- मालाड पश्चिमेच्या लिबर्टी गार्डन परिसरातील अनुराग इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यावेळी दुसऱ्या व पहिल्या मजल्याचा स्लॅबही तळ मजल्यावर कोसळला. या घटनेत दोन जण जखमी झाले.
या घटनेतील जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत 35 ते 40 वर्षे जुनी आहे. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीतील इतर रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हेही वाचा :