रायगड: मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस- कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू; १० जखमी | पुढारी

रायगड: मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस- कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू; १० जखमी

रायगड; पुढारी वृत्तसेवा : आज सकाळी ७ च्या सुमारास मुंबई लेन किमी नं. ३६ ला खासगी बस व कंटेनरमध्ये अपघात झाला. ही खासगी आराम बस सिंधुदुर्ग येथून लग्नसोहळा आटोपून शहापूरला येत होती. दरम्यान, परतताना बसला पाठीमागून कंटेनरने धडक दिली.  बसमध्ये ३५ प्रवासी होते. ठोकर लागल्यामुळे बसचा चालक बसमधून बाहेर फेकला गेला. कंटेनरखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

संकेत सावंत (रा. डाेंबिवली) असं बसचालकाचं नाव आहे. अपघातामध्ये १० प्रवाशी जखमी असून त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये येथे दाखल केले आहे. वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा पाेलिस अधिक्षक साेमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button