Share Market Closing Bell : महागाईत घट! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, ‘हे’ ४ फॅक्टर्स ठरले महत्त्वाचे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

Share Market Closing Bell : जागतिक सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत किरकोळ महागाई दरात (retail inflation) घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.१३) भारतीय शेअर बाजारात तेजीत दिसून आली. आज बाजार खुला होताच सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून ६२,२०० वर गेला. तर निफ्टी १८,५०० वर पोहोचला होता. त्यानंतर सेन्सेक्स ४०२ अंकांनी वाढून ६२,५३३ वर बंद झाला. तर निफ्टी ११० अंकांनी वाढून १८,६०८ वर बंद झाला. नोव्हेंबरमधील देशांतर्गत किरकोळ महागाई दर आरबीआयच्या मर्यादेपेक्षा कमी झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. परिणामी, शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक वधारले.

कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?

टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि टाटा स्टील आज NSEवर सर्वाधिक १.२१ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. तर अपोलो हॉस्पिटल्स, पॉवरग्रीड, एचयूएल, बीपीसीएल आणि एशियन पेंट्स हे यांचे शेअर्स मागे पडले होते. बीएसईवर १,९७४ शेअर्स वधारले तर ८५८ शेअर्स घसरल्याचे दिसून आले. येस बँक, जेपी पॉवर, जेपी असोसिएट्स, सुझलॉन, आयआरएफसी, पीएनबी, साउथ इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयएफसीआय आणि धनलक्ष्मी बँक हे एनएसईवर व्हॉल्यूमच्या दृष्टीने सर्वात सक्रिय शेअर्स होते.

'हे' शेअर्स १० टक्क्यांहून अधिक वाढले

बीएसईवर काही शेअर्स १० टक्क्यांहून अधिक वाढले. १० टक्क्यांहून अधिक वधारलेल्या शेअर्समध्ये गिनी सिल्क मिल (१४ टक्के), 8K माइल्स सॉफ्ट (१४ टक्के), धनलक्ष्मी बँक (१४ टक्के), यशराज कंटेन (१३ टक्के), युनायटेड ड्रिलिंग (१२ टक्के), रविलीला ग्रॅन (१०.८५ टक्के) आणि मोटर जनरल फिन (१० टक्के) यांचा समावेश होता.

जयप्रकाश असोसिएट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण, 'हे' आहे कारण

दालमिया भारतच्या उपकंपनीसोबत मालमत्ता विकण्यासाठी करार केल्यानंतर जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुमारे ८ टक्क्यांची घसरण झाली. नवी दिल्ली येथील दालमिया भारतच्या मालकीची उपकंपनी असलेल्या दालमिया सिमेंटने घोषणा केली आहे की ती जेपी असोसिएट्सची मालमत्ता ५,६६६ कोटी रुपयांना विकत घेईल. या मालमत्तेत सिमेंट आणि पॉवर प्लांटचा समावेश आहे.

नोव्हेंबरमध्ये महागाई दरात घट

अन्नधान्यांच्या किमतीत कमी वाढ झाल्याने देशातील वार्षिक किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये ५.८८ टक्क्यांपर्यंत आला, जो ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के होता. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.४० टक्के राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. (Stock market Today)

अमेरिकेसह आशियाई बाजारात पॉझिटिव्ह ट्रेंड

अमेरिकेच्या शेअर बाजारातील तेजीचा मागोवा घेत आशियाई शेअर्स वधारले. जपानचा निक्केई निर्देशांक ०.३० टक्क्यांनी, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.०३ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.५६ टक्क्यांनी वधारला. चीनचा शांघाय कंपोझिट मात्र ०.२१ टक्क्यांनी घसरला. (Share Market Closing Bell)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news