सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचे : शरद पवारांची पीएम मोदींवर टीका

शरद पवार
शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधानांनी काल विरोधकांवर टीका केली. जाहीर सभेत पक्षाची भुमिका मांडणे त्यांचा अधिकार आहे. पण रेल्वेचे, रस्त्याचे, हॉस्पिटलचे उद्धाटन हा सरकारी कार्यक्रम आहे. त्या व्यासपीठावरून ते विरोधकांवर टीका टीप्पणी करतात, हे कितपत शहाणपणाचे आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस आज आहे. यानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राज्यकर्त्यांनी राज्यांकडे, प्रांतांकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतोय याचं स्मरण ठेवलं पाहीजे. कालच्या भाषणात पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. पक्षाची भुमिका मांडायचा त्यांचा शंभर टक्के अधिकार आहे. पण रस्त्याचे उद्धाटन सरकारी कार्यक्रम, रेल्वेचे उद्धाटन सरकारी कार्यक्रम, हॉस्पिटलचे उद्धाटन सरकारी कार्यक्रम आणि सरकारी कार्यक्रमाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळी करतो त्याच व्यासपिठावर विरोधकांवर टीका टीप्पणी ही भूमिका मांडतो, हे कीतपत शहाणपणाचे आहे. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहीलेत ऐकलेत. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यानंतरच्या अनेक पंतप्रधानांचीसुद्धा भाषणे पाहिलीत. पण अशी टीका टीप्पणी त्यांनी केली नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की, समृद्धी महामार्गाला विरोधकांनी विरोध केला. पण कोणी विरोध केला माहित नाही. शिक्षण मंत्र्यांवर शाही फेकली त्याचे मी समर्थन करणार नाही. शिक्षणमंत्र्यांनी जे बोलणं केलं ते केलं नसतं तर असे प्रकार झाले नसते. फूले आंबेडकरांबद्दल भीक मागण्याचे शब्द वापरले नसेत तर बर झालं असतं, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news