पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपच गुजरातचा विकास करू शकतो, हे या निकालाने सिद्ध झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला ५२ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाली. तर आपचे पुरते बारा वाजले. गुजरातमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या सर्व आमदारांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले की, गुजरातमध्ये जेथे प्रचार सभेला गेलो तेथे मोदींचा जयघोष ऐकू आला. यावेळीच गुजराती जनतेचा मूड दिसून आला. गुजरातमधील जनतेने आपला नाकारले आहे. आप हा पक्ष दिल्लीपुरता मर्यादित पक्ष असल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील आणि मुंबई महापालिकेवर भाजप आणि युतीची सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ब्रम्हास्त्रापेक्षा मोठे शस्त्र असल्याची खोचक टीका करत त्यांनीच राज्यातील सर्वात मोठा पक्ष बाहेर घालवला,असा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.
हेही वाचा :