धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; गुप्तांगावर माचिसच्या पेटवलेल्या काड्या टाकून दिले चटके

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कुर्ल्यामध्ये एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिघांनी तिच्यावर अमानुष अत्याचार करत चाकूच्या धाक दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि हत्यारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याने कुर्ला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला कुर्ला पश्चिम परिसरात रहाते. ३० नोव्हेंबरच्या पहाटे बबलू, वसीम आणि मुन्ना नावाचे तीन जण तिच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी पीडितेला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तिघांनीही तिला विवस्त्र करत तिचे हात पाय आणि तोंड बांधले. हे विकृत एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी माचिसच्या काड्या पेटवून त्या पीडितेच्या गुप्तांगावर टाकल्या. त्यानंतर या तिघांनीही चाकूच्या धाकावर पीडितेवर क्रुरपणे आळीपाळीने बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

यातील एका आरोपीने पीडिता विव्हळत असताना त्याचे मोबाईलमध्ये शुटींगसूद्धा केले. तर, एका नराधमाने चाकूने तिच्या हातावर आणि छातीवर वार करुन तेथून पळ काढला. त्यानंतर पीडित महिला उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल झाली आणि बलात्काराचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी बबलू, वसीम आणि मुन्ना या तिघांविरोधात भादंवि कलम ३७६, ३७६(३), ३७७, ४५२, ३५४, ३२४, ५०९, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news