बावडा : इंदापूर तालुक्यात शेतकरीबांधव खरीप हंगामातील वाळलेल्या मकवानाची जनावरांच्या चार्यासाठी साठवणूक करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात मक्याचे पीक तिन्ही हंगामात घेतले जाते. जनावरांच्या गोठ्यानजीक बुचडे लावून तसेच गंज लावून मक्याची साठवणूक केली आहे. बुचडे लावून मक्याची साठवणूक केल्याने मकवान पावसात भिजत नाही, खराबही होत नाही.
बुचड्यातून मकवान सहजपणे काढता येते, अशी माहिती प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील व आशिष नायकुडे (बावडा), रणजीत खाडे (शहाजीनगर), अतुल वाघमोडे (काटी) यांनी दिली. वाळलेले मकवान हे फारसे पौष्टिक नसले तरी सहजपणे उपलब्ध होत असल्याने केला जात आहे, असे दूध उत्पादक शरद जगदाळे-पाटील (टणू), दयानंद गायकवाड (बोराटवाडी), सचिन माने (भगतवाडी-बावडा) यांनी सांगितले.