कुख्यात दहशतवादी हरप्रीत सिंग एनआयएच्या जाळ्यात | पुढारी

कुख्यात दहशतवादी हरप्रीत सिंग एनआयएच्या जाळ्यात

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा : गतवर्षी पंजाबमधील लुधियाना येथे न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणणारा कुख्यात दहशतवादी हरप्रीत सिंग याला राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. मलेशियातून भारतात परतत असताना हरप्रीत याला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये बसून इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशनच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया करणार्‍या लखवीरसिंग रोड याचा हरप्रीत हा साथीदार आहे. रोड याच्या आदेशावरून हरप्रीतने आयईडीच्या माध्यमातून लुधियाना न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

या स्फोटात एक इसम ठार झाला होता तर दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या हरप्रीतची माहिती देणार्‍यास एनआयएने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष एनआयए न्यायालयाने त्याच्याविरोधात गैरजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

Back to top button