शिक्षणमहर्षी कमलाकर सुभेदार यांचे निधन | पुढारी

शिक्षणमहर्षी कमलाकर सुभेदार यांचे निधन

मालाड, पुढारी वृत्तसेवा : थोर समाजवादी विचारवंत, सोशालिस्ट पार्टी इंडियाच्या संसदीय बोर्डाचे सदस्य, समता शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी कमलाकर सुभेदार यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. दुपारी दोन नंतर सागबाग स्मशानभूमी, मरोळ, अंधेरी पूर्व येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

समाजातील तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहाचवणारे, समाजातील विषमता दूर झाली पाहिजे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे, साने गुरुजी यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक साथी म्हणून त्यांना ओळखले जात होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button