मुंबई : उपहारगृह पुढे चालू ठेवण्यासाठी २५ हजाराची लाच घेणा-या पीडब्लूडी अधिका-याला अटक | पुढारी

मुंबई : उपहारगृह पुढे चालू ठेवण्यासाठी २५ हजाराची लाच घेणा-या पीडब्लूडी अधिका-याला अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शासकीय विश्रामगृहातील उपहारगृह कंत्राटी पध्दतीने चालू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजाराची मागणी सार्वजनिक बांधकाम अधिका-याकडून करण्यात आली होती. वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम अधिकारी हेमंत पांडुरंग राठोड (वय ५२) यांना २५ हजार रूपये लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.

याबाबत मिळालेलया माहितीनुसार, फिर्यादी यांनी शासकिय विश्रामगृहात कंत्राटी पध्दतीने उपहारगृह चालविण्यास घेतले आहे. सदर उपहारगृह पुढे चालु ठेवण्यासाठी २२ नोव्हेंबर रोजी राठोड यांनी फिर्यादी यांचेकडे दरमहा ५०,००० इतक्या रक्कमेच्या लाचेची मागणी केली होती. मात्र फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी २८ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे प्रत्यक्ष हजर राहून लेखी तक्रार अर्ज दिला होता.

अनुषंगाने सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान फिर्यादी यांच्याकडे ५०,००० इतक्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २५,००० लाचेची रक्कम स्विकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Pigeon Meat : मुंबईतील रहिवाशांनी रेस्टॉरंटला पुरवले कबुतराचे मांस; आठ जणांना अटक

अग्निशमन जवानांचे शिडीवर चढण्याचे कष्ट कमी होणार! 

नगर: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती झाली रद्द, १३ लाख विद्यार्थ्यांना फटका 

Back to top button