
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपालांनी अनेकदा महाराष्ट्रासंदर्भात वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी राज्यपालांना पदमुक्त करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दि. २० केली. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर विचारलेल्या प्रश्नी ते माध्यमांशी बोलत होते.
या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "राज्यातून पाच प्रकल्प अन्य राज्यांमध्ये गेले आहेत. राज्य सरकार अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे. खोके सरकारकडून महाराष्ट्राचे खच्चीकरण होत आहे."
सगळेच राजकीय पक्ष सध्या इतिहासावरुन भांडत बसले आहेत. आताच्या मुद्द्यावर कोणताही पक्ष लढताना दिसू येत नाही.राज्यपालांनी यापूर्वीही महाराष्ट्राबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा