गोवा : सासष्टीत गुंडगिरीला पुन्हा ऊत; तरुणाला नग्न करून मारहाण

गोवा : सासष्टीत गुंडगिरीला पुन्हा ऊत; तरुणाला नग्न करून मारहाण
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :   सासष्टीत पुन्हा गुंडागिरीने मान वर काढली आहे. पूर्ववैमनस्यातून कुडतरी येथील विजय कुलाल (वय 35) या युवकाला नग्न करून त्याची धिंड काढत दांडे, हॉकी स्टिक यांच्या साहाय्याने जबर मारहाण करण्यात आली. हा अमानुष प्रकार फातोर्डा येथे रविवारी मध्यरात्री 2.30 वा. च्या दरम्यान घडला.

माणुसकीला काळीमा फासण्याची ही घटना वैमनस्यातून घडली आहे. विजयचे कपडे काढत आणि रस्त्यावर फरकटत त्याची धिंड काढण्यात आली. त्याचा चेहरा पायाखाली तुडवत त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल केल्याने गोव्यात खळबळ माजली आहे.
या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी वॉल्टर फर्नांडिस, जोझेफ सिक्वेरा आणि सायमन या तीन युवकांच्या विरोधात भादंस कलम 143, 147, 341, 324, 506 तसेच 149 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत माहिती अशी, मारहाण झालेला विजय कुलाल ऊर्फ विजू हा रालवाय कुडतरी येथील राहणारा आहे. तर मारहाण करणारा दुसरा गट नावेली आणि कुडतरी भागातील आहे. या गटामध्ये आणि विजू याच्या गटामध्ये पूर्वीपासूनचे वाद होते. रविवारी कोलवा येथील एका हॉटेलमध्ये मारहाण करणारा युवकांचा गट बसला होता. त्यावेळी विजू आणि या गटामध्ये जुन्या विषयावरून वाद उफाळून आला. त्यानंतर विजू तेथून निसटल्यामुळे ते युवकही त्याच्या मागावर गेले. त्यांना कोलवा सर्कल येथे मध्यरात्री 2.30 वाजता विजू सापडला. त्यावेळी या युवकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवत दांडे, हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याला मारहाण होत
असल्याचे पाहून त्याच्या बरोबर असलेल्यांनी तेथून धूम ठोकली. विजू जखमी होऊन खाली कोसळल्या नंतरही युवक त्याला मारहाण करत होते. एकाने त्यांच्या डोक्यावर दगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या इतर साथीदारांनी त्याला बाजूला केले. मात्र हा दगड विजूनच्या कंबरेवर पाडल्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. तरीही त्याला तसेच फरफटत रस्त्यावर आणण्यात आले आणि एक एक करून त्याला नग्न करून पुन्हा मारहाण करण्यात आली. या सर्व घटनेची चित्रफीत बनवून व्हायरल करण्यात आली.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती, पण कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. सोमवारी रात्री उशिरा फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. उशिरा काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

विजयचे कुख्यात गुंडाशी संबंध

विजय कुलाल याचे उत्तर गोव्यातील एक आमदाराशी घनिष्ठ संबध आहेत. शिवाय उत्तरेतील एका कुख्यात गुंडाच्या तो खास मार्जितील आहे. त्यांच्या पाठिंब्यावर त्याने सासष्टीतील गुन्हेगारांशी पंगा घेतला होता. त्याला मारण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. यातूनच ही मारहाण झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news