Bhima Koregaon Violence : सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडेंची तुरुंगातून सुटका | पुढारी

Bhima Koregaon Violence : सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडेंची तुरुंगातून सुटका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भिमा कोरेगाव दंगल, एल्गार परिषद आणि नक्षवादाशी संबध प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांची शनिवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. एका अधिकाऱ्याने याबाबतची अधिकृत माहिती दिली. त्यांना मिळालेल्या जामिनाला आव्हान देणारी राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. (Bhima Koregaon Violence)

अडीच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तेलतुंबडे यांची आज (शनिवारी) दुपारी १.१५ वाजता तळोजा तुरुंगातून बाहेर आले. या वेळी संबधित अधिकाऱ्याने सांगितले. “मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांच्या जामिनाला आव्हान देणारा एनआयएचा अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर जामिनाची औपचारिकता पूर्ण करून त्यांची सुटका करण्यात आली. (Bhima Koregaon Violence)

संबधित प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 16 जणांपैकी जामिनावर सुटणारे आंनद तेलतुंबडे हे तिसरी व्यक्ती आहे. या आधी कवी वरावरा राव प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत, तर वकील सुधा भारद्वाज या नियमित जामिनावर बाहेर आल्या आहेत. (Bhima Koregaon Violence)

हे प्रकरण 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या अधिवेशनात कथितपणे प्रक्षोभक भाषणाशी संबंधित आहे. या भाषणामुळेच दुसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार उसळला, असा पोलिसांचा दावा आहे.

कथित माओवाद्यांशी संबंध असलेल्या व्यक्तींनी ही परिषद आयोजित केल्याचा दावाही पुणे पोलिसांनी केला आहे.

आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी घेत ही याचिका फेटाळून लावली.


अधिक वाचा :

Back to top button