Heart attack Symptoms : वेळीच धोका ओळखा : हृदयविकारापूर्वी पुरुषांना जाणवतात ‘ही’ लक्षणे…

Heart attack Symptoms : वेळीच धोका ओळखा : हृदयविकारापूर्वी पुरुषांना जाणवतात ‘ही’ लक्षणे…

हृदयविकार हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हृदयाची विफलता, कोरोनरी हार्ट डिसीज, एनजाइना आणि ऍरिथमिया यासारख्या काही हृदयासंबंधित समस्या सामान्यतः दिसून येतात. ( Heart attack Symptoms )

वृद्ध लोकांमध्ये किंवा प्रौढ व्यक्तींमध्ये आणि पुरुष असो वा स्त्री, हृदयविकार ही खूप सामान्य घटना ठरत आहे. बैठी जीवनशैली ही हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची उच्च पातळी आणि रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण, धूम्रपान आणि ताणतणाव हे हृदयविकाराला बळी पाडू शकतात. एखाद्याचा कौटुंबिक इतिहास असल्यास भविष्यात हा विकार जडण्याची दाट शक्यता असते. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत हृदयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे.

Heart attack Symptoms : पुरुषांमधील हृदयविकाराची ही लक्षणे

अस्वस्थता जाणवणे : काही लोकांना असे वाटते की, त्यांच्या छातीत धडधड वाढून जळजळ झाल्याचे दिसून येते. असे विशेषतः चालल्यानंतर किंवा काही काम केल्यानंतर दिसून येते. छातीतील अस्वस्थता काही पुरुषांमध्ये कोरोनरी धमनी रोग दर्शवू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानंतरच उपचार सुरू करणे महत्त्‍वाचे असते.

मळमळ, अपचन आणि पोटदुखी : काही रुग्णांमध्ये पोटदुखी हे हृदयविकाराचे प्राथमिक लक्षण असते.

हातासंबंधित वेदना : जेव्हा वेदना छातीतून डाव्या हाताकडे पसरते तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. डाव्या खांद्यावर आणि हातामध्ये सुन्नपणा आणि अशक्तपणादेखील दिसू शकतो.

चक्कर येणे : हृदय, मेंदू आणि इतर भागांमध्ये रक्त पंप करण्यास असमर्थ ठरत असेल,एखाद्याला चक्कर येणे किंवा डोकेदुखीदेखील जाणवू शकते. शरीरात आवश्यक प्रमाणात रक्त प्रवाह नसताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे घडू शकते. हलकीशी डोकेदुखी आणि चक्कर येणे हा हृदयाच्या कार्डिओमायोपॅथीशी संबंधित त्रास असू शकतो.

छातीत दुखणे किंवा एनजाइना ही छातीतील वेदना आहे, जी डाव्या खांद्यावर किंवा घशापर्यंत पसरते. हे चालणे किंवा इतर क्रियाकल्प केल्यानंतर घडते.

कोणताही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांना सांगण्यास अजिबात संकोच करू नये. त्यामुळे वेळीच योग्य उपचार घेणे शक्य होईल.

– डॉ. बिपीनचंद्र भामरे 

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news