अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, कारागृहातील मुक्काम वाढला! | पुढारी

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच, कारागृहातील मुक्काम वाढला!

मुंबई : पुढारी ऑनलाईन; कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी अटकेत असलेल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अद्याप कसलाही दिलासा मिळालेला नाही. विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या विरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हे अपील ॲड. अनिकेत निकम यांनी आज सकाळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या निर्शनास आणून दिले. पण न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाच्या जामीन नाकारल्याच्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेण्यास उच्चं न्यायालयाने असमर्थता दर्शविली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वैयक्तिक कारणास्तव सुनावणीला नकार दिला

हे अपील अॅड. अनिकेत निकम यांनी आज सकाळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी न्यायालयाने दुपारी अडीज वाजता सुनावणीच्यावेळी न्यायालयाने अपील्यावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविली. या पूर्वीही याच न्यायाल्यायाने देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास असमर्थाता दर्शवली होती. त्यामुळे हे अपील साडे चार वाजता न्यायमूती एस . के. शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्याची शक्यता आहे.

 

 हे ही वाचा :

Back to top button