राहुल गांधींनी केलेली विचारपूस राजकारणातील कडवटपणात प्रेमाची झुळूक : संजय राऊत | पुढारी

राहुल गांधींनी केलेली विचारपूस राजकारणातील कडवटपणात प्रेमाची झुळूक : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. तरीही त्यांनी रविवारी ( दि. २० ) रात्री फोनवरून माझ्‍या प्रकृतीबाबत विचारपूस केली. “तुमची खूप चिंता होती, काळजी घ्या,” असे ते या वेळी म्हणाले. भाजप, मनसेच्या किती नेत्यांना काळजी, चिंता वाटली हे माहीत आहे; पण राहुल गांधीनी केलेली विचारपूस ही राजकारणात आलेल्या कडवटपणात प्रेमाची झुळूक होती, असे मत खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. २०) माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केले.

… तर भाजपने थयथयाट केला असता

राज्यपालांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय, सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याबद्‍दल आदर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. यावर राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या बद्दल दुसरे कोणी बोललं असत तर भाजपने थयथयाट केला असता; पण भाजपचेच राज्यपाल व प्रवक्ते शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य करतात. तुम्ही त्यांचा बचाव करता, याचा अर्थ तुमचे शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमाना संदर्भातील प्रेम खरं नाही, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याचं आम्‍ही समर्थन करत नाही. हा आमच्यात आणि भाजपमधील फरक आहे. भाजपचे राज्यपाल व प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य करतात आणि तुम्ही त्यांचा बचाव करता, असेही राऊत म्‍हणाले.

हेही वाचा :

Back to top button