Bhagat Singh Koshyari : ‘एक स्वाभिमानी मिंधे सरकार’, राऊतांचा ट्विटरवरून शिंदे सरकारवर निशाणा | पुढारी

Bhagat Singh Koshyari : 'एक स्वाभिमानी मिंधे सरकार', राऊतांचा ट्विटरवरून शिंदे सरकारवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ”महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली. एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला !!! जय महाराष्ट्र!” असं ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Bhagat Singh Koshyari : काय आहे नेमकं प्रकरण

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (दि.१९) वादग्रस्त विधान केले. एका कार्यक्रमात भाषण देताना म्हणाले, “आम्ही जेव्हा शिकत होतो. हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे की, तुमचा आवडता हिरो कोण? तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा आमच्यापैकी काहींना सुभाषचंद्र बोस, कोणाला नेहरू तर कोणाला महात्मा गांधी आवडत होते. मला असे वाटते की, जर कोणी तुम्हाला विचारत असेल की, तुमचा आवडता हिरो कोण आहे? तर त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे हिरो महाराष्ट्रातचं मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी सध्याच्या घडीबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला इथेच तुमचे हिरो मिळतील. राज्यपालांच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या भाषणाचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का?

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘ट्विट करत राज्यपालांबरोबरच शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली. एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला !!! जय महाराष्ट्र!

हेही वाचा

Back to top button