मुंबई : पुढारी ऑनलाईन; मनी लाँड्रिंग प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. पण इतर प्रकरणांमुळे सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. याच मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हेदेखील संशयित आरोपी आहेत.
बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये पोलीस दलातून बडतर्फ केलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांना दिले. तसेच देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले, असा धक्कादायक दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात केला होता.
तसेच ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनाही अटक केली होती. २९ डिसेंबर २०२१ रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.
हे ही वाचा :