धर्म बदलण्यास नकार दिल्याने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकले; प्रियकरासह कुटुंबावर हत्येचा गुन्हा | पुढारी

धर्म बदलण्यास नकार दिल्याने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकले; प्रियकरासह कुटुंबावर हत्येचा गुन्हा

लखनौ : वृत्तसंस्था :  श्रद्धा वालकरचा लिव्ह इन पार्टनर आफताब याने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीला आली असतानाच ‘यूपी’ची राजधानी लखनौ येथील दुबग्गा भागात धर्म बदलण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन तिची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

गंभीर जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून धर्मांतरसक्तीचा खून गुन्हा आणि तिच्या प्रियकरासह त्याच्या कुटुंबावर दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, निधी गुप्ता (वय १९) हिचे सुफियान याच्यासोबत प्रेमसंबंध होते.

सुफियानने काही दिवसांपूर्वी तिला मोबाईलही घेऊन दिला होता. सुफियान व निधीच्या कुटुंबीयांचे त्यावरून भांडणही झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तडकाफडकी सुफियान आणि त्याचे कुटुंब फरार झाले. सुफियान हा सारखा निधीला धर्मांतरास प्रवृत्त करत होता. निधी त्यासाठी तयार नव्हती.

निधी गच्चीवर गेली असता सुफियानही तिच्या मागोमाग गेला. दोघांचे भांडण झाले. आवाज ऐकून आम्ही गच्चीवर गेलो. सुफियान गच्चीवर एकटाच होता. आम्ही खाली डोकावले तेव्हा निधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सुफियानला पकडण्याचा दिसली. प्रयत्न निधीच्या कुटुंबीयांनी केला; पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. सुफियान धर्मांतरावर अडून असल्याने निधीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, असे निधीच्या आईने सांगितले.

 

Back to top button