बाली : वृत्तसंस्था, G 20 Summit : जी- २० संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या संघटनेला अधिक समावेशक, निर्णायक आणि कृतिशील बनवले जाईल. जी- २० ला जागतिक बदलाचे माध्यम केले जाईल, अशी ग्वाही देत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षासाठी जी- २० चे अध्यक्षपद स्वीकारले.
G 20 Summit : जगातील शक्तिशाली देशांची संघटना असलेल्या जी- २० शिखर परिषदेचा बुधवारी बाली येथे समारोप झाला. समारोप सोहळ्यात मावळते अध्यक्ष इंडोनेशियाचे जोको विडोडो यांनी लाकडी हातोडा वाजवत समारोपाची घोषणा केली आणि हातोडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औपचारिकरित्या सोपवला. यामुळे १ डिसेंबरपासून जी-२० चे अध्यक्षपद व संघटनेच्या सर्व बैठकांचे यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले. पुढील वर्षी जी- २० देशांच्या प्रतिनिधींच्या सुमारे २०० बैठका भारतात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत, तर सप्टेंबर महिन्यात दिल्लीत शिखर परिषद होणार आहे.
G 20 Summit : सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडे !
भारताच्या यजमानपदाच्या काळात संघटना अधिक समावेशक, निर्णायक आणि कृतिशील बनवली जाईल. जी-२० ही जागतिक बदलाचे मध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताकडे जग आशेने बघत आहे.
जग अनेक भूराजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्न व ऊर्जेवरील खर्चात वाढ, कोरोनानंतरचे दुष्परिणाम अशा संकटांना तोंड आहे. अशा बिकट काळात संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. जग जी-२० कडे आशेने बघत आहे. ही जबाबदारी मोठी आहे आणि आपण ती पेलून दाखवू, असेही ते म्हणाले. जी-२० ने जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश द्यायचा आहे. त्यासाठीच भारताची मध्यवर्ती कल्पना 'वसुधैव कुटुंबकम्' ही निश्चित करण्यात आली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. नव्या संकल्पना आणि सर्व सहभागातून कृतीला गती देण्याच्या बाबतीत जी-२० अग्रेसर राहण्यासाठी भारत निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाची फळे जगात सर्वांपर्यंत पोहोचायला हवीत, असे मोदी म्हणाले.
हे ही वाचा :