हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात

मुंबई, पुढारी ऑनलाईन : १२७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीत ईडी कार्यालयात पोाहेचले आहेत. काल जाहीर केल्याप्रमाणे ते ईडीकडे आज अधीकृत तक्रार करणार असून त्याबाबत कागदपत्रे सोपविणार आहेत.

कागलचे आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते.

मुश्रीफ यांनी मनी लाँड्रींग केल्याचा गंभीर आरोप केला होता.

हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांकडून दोन कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हसन मुश्रीफ आणि परिवाराचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक बेनामी व्यवहार केल्याचे सोमय्या म्हणाले होते.

Mula Dam : मुळा धरणाचे ५ दरवाजे उघडले, नदी पात्रात विसर्ग सुरू

खासदार प्रिन्स पासवान यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार देणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते.

मुश्रीफ पिता- पुत्रांनी १२७ कोटींचे बेनामी व्यवहार केले असून मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती प्रकरणी मुश्रिफांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेताच हसन मुश्रीफ यांनी १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले.

सोमय्या यांच्या डिग्रीवरच शंका व्यक्त करून खुशाल तक्रार दाखल करावे, असे आव्हानही दिले.

हेही वाचा : 

Back to top button