अबू आजमींशी संबंधीत २० ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी | पुढारी

अबू आजमींशी संबंधीत २० ठिकाणांवर आयकर विभागाची छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांच्याशी संबंधीत २० ठिकाणांवर आयकर विभागाने (Income Tax) आज (मंगळवार) छापे टाकले. मुंबईसह महाराष्ट्रात, लखनौ, उत्तर प्रदेशात ही छापेमारी करण्यात आली. आज सकाळपासूनच हे छापासत्र सुरू आहे. दरम्यान, अमरावतीच्या दौऱ्यावर असलेले आजमी दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊमध्ये २० हून अधिक ठिकाणी छापे टाकल्याचे वृत्त आहे. त्यांचे निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या घरावर आयकर विभागाने (आयटी) छापे टाकले. हे छापे बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित आरोपांशी संबंधित आहेत. आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत, अबू आझमीचे ते निकटवर्तीय आणि सपाचे सरचिटणीस होते. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. आभा गुप्ता यांच्या कंपन्यांच्या ठिकाणीही छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा :

Back to top button