W. Bengal TET : ममता बॅनर्जींना ९२ तर अमित शहांना ९३ गूण! ‘टीईटी’ निकालानंतर प. बंगालमध्‍ये खळबळ | पुढारी

W. Bengal TET : ममता बॅनर्जींना ९२ तर अमित शहांना ९३ गूण! 'टीईटी' निकालानंतर प. बंगालमध्‍ये खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा )निकलात पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ज्‍येष्‍ठ नेते सुवेंदु अधिकारी यांचे नाव आल्‍याने खळबळ उडाली आहे. ( W. Bengal TET ) या प्रकरणाचा सखोल चौकशीचे आदेश शिक्षण विभागाच्‍या वतीने देण्‍यात आले आहेत.

पश्‍चिम बंगालमध्‍ये प्राथमिक शिक्षण बोर्डच्‍या वतीने २०१४ मध्‍ये घेण्‍यात ‘टीईटी’चा निकाल जाहीर झाला आहे. गुणवता यादीत राजकीय नेत्‍यांच्‍या नावांचा समावेश असल्‍याने शिक्षण विभागाचे अधिकारी हादरले आहेत. विशेष म्‍हणजे या नेत्‍यांचे गुणही जाहीर झाले आहेत. टीईटी गुणवता यादीत ममता बॅनर्जी, अमित शहा, सुवेंदु अधिकारी अशा नेत्‍यांच्‍या नावाचा समावेश आहे. या सर्वांवर कळस म्‍हणजे, प्राथमिक शिक्षण बोर्डचे अध्‍यक्ष गौतम पॉल यांच्‍या नावाचाही समावेश गुणवत्ता यादीत आहे.

नेत्‍यांना मिळालेले गुणही जाहीर

पश्‍चिम बंगाल टीईटी गुणवत्ता यादीत ममता बॅनर्जी यांना ९२ तर भाजपच्‍या सुवेंदु अधिकारी यांना १०० गुण प्राप्‍त झाले आहेत. अमित शहा यांचा परीक्षा क्रमांक ०७५०२०६३९ असा आहे. त्‍यांना ९३ गुण मिळाले आहेत. राजकीय नेते दिलिप घोष आणि सुजान चक्रवर्ती यांना ९२ गुण मिळाले आहेत.

W. Bengal TET : प्रकरण उच्‍च न्‍यायालयात

या प्रकरणी वकिलांनी कोलकाता उच्‍च न्‍यायालयात धाव घातली आहे. उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्‍याय यांना या प्रकरणाच्‍या चौकशीचे आदेश देण्‍याची मागणी केली आहे. गुणवत्ता यादीत आलेली नावे ही परीक्षार्थींची आहेत का, याची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

 शिक्षण विभागाने केला खुलासा

पश्‍चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डाचे अध्‍यक्ष गौतम पॉल यांनी म्‍हटलं आहे की, राज्‍याला बदनाम करण्‍यासाठीचे हे एक राजकीय षड्‍यंत्र आहे. दरम्‍यान, याप्रकरणी दाद मागण्‍यासाठी सोमवारी ( दि. १४ ) विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण बोर्डाच्‍या कार्यालयात धाव घेतली होती. या प्रकरणीच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button