पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नसराईच्या सुरुवातीलाच सोने महागले आहे. आज सोमवारी (दि.१४) शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या दरात २७९ रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ५२,५६० रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या दरात आणखी तेजी येणार असून ते ५६ हजार रुपयांवर जाऊ शकते, अशी शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ६१,५०० रुपयांवर आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे २ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचा दर ५२,२८१ रुपयांवर बंद झाला होता. आज सोने ५२,५०० रुपयांवर पोहोचले. याआधी सोन्याने ५६,६०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. या तुलनेत सध्याचा सोन्याचा दर ४,१०० रुपयांनी कमी आहे.
सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. यामुळे सोन्याला मागणी वाढून दरात तेजी आली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आहे. येथे सोन्याचा भाव प्रति औंस १,७०० डॉलरच्या वर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्यात दागिने बनविले जातात. २२ कॅरेट सोन्याचा दर २५६ रुपयांनी वाढून ४८,१४५ रुपयांवर पोहोचला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुक्रवारी (दि.१४) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,५६० रुपयांवर खुला झाला आहे. २३ कॅरेट सोने ५२,३५० रुपये, २२ कॅरेट सोने ४८,१४५ रुपये, १८ कॅरेट ३९,४२० रुपये, १४ कॅरेट सोन्याचा भाव ३०,७४८ रुपयांवर आहे. चांदीचा दर प्रति किलो ६१,५०० रुपयांवर खुला झाला आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :