ईपीएफओच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी पीएफ खाते नेहमीच अपडेट ठेवावे लागते. यानुसार बँक खात्याचे विवरण ईपीएफओकडे अचूक असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आयएफएससी कोड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा क्रमांक आहे. हा कोड पीएफकडे अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
देशातील नोकरदार वर्गांना निवृत्तीच्या काळात आणि आर्थिक अडचणीच्या काळात 'इपीएफओ'ने नेहमीच मदत केली आहे. देशातील कोट्यवधी नोकरदारांच्या वेतनातील काही भाग ईपीएफओच्या खात्यात दरमहा जमा होतो आणि तेवढाच पैसा कंपनीकडूनदेखील जमा केला जातो.
'ईपीएफओ'च्या खात्यात जमा होणार्या रक्कमेवर मिळणारे व्याज हे देशातील कोणत्याही बँकेपेक्षा अधिक असते. म्हणूनच नोकरदार मंडळी पीएफच्या फंडाबाबत सजग असतात. एवढेच नाही, तर गरज भासल्यास पैसेदेखील काढू शकतात. अर्थात ईपीएफओच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी पीएफ खाते नेहमीच अपडेट ठेवावे लागते. यानुसार बँक खात्याचे विवरण ईपीएफओकडे अचूक असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आयएफएससी कोड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा क्रमांक आहे. हा कोड पीएफकडे अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
खाते बदलल्यास 'आयएफएससी' कोडमध्ये बदल
एखादा व्यक्ती नोकरी बदलतो किंवा नव्या नोकरीनिमित्ताने शहरही बदलतो. अशा वेळी नव्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या नियमानुसार नवे खाते सुरू करावे लागते. खाते बदलले की आयएफएससी, बँ—च कोडही बदलतो. आपणही अलीकडेच खाते बदलले असेल किंवा आगामी काळात खात्यात बदल करायचा असेल, तर आयएफएससीची माहिती जाणून घ्यायला हवी. नोकरीत बदल केल्यास किंवा खाते बदलल्यास पीएफ खात्यातदेखील आयएफएससी कोड अपडेट करणे आवश्यक आहे. इपीएफओ खात्याला आयएफएससी कोड अपडेट केला नाही, तर पीएफ खात्यातून पैसे काढताना अडचणी येऊ शकतात. म्हणूनच आयएफएससी कोड अपडेट असणे गरजेचे आहे. या ठिकाणी ईपीएफओ खात्याला आयएफएससी कोड अपडेट करण्याचा सोपा आणि सुलभ मार्ग सांंगता येईल.
आयएफएससी कोड अपडेट करण्याचा मार्ग
सुरुवातीला ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ https://www.epfindia.gov.in/site_en/index.php जावे लागेल.
संकेतस्थळाच्या होमपेजवर वरच्या बाजूला सर्व्हिसेसच्या नावाचा टॅब दिसेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल.
सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर फॉर इम्ल्पॉईस ऑप्शन क्लिक करावे लागेल.
फॉर इम्प्लॉईजवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज सुरू होईल. त्यावर खालच्या बाजूला सर्व्हिसेसच्या सेक्शनमध्ये मेंबर यूएएन/ऑनलाईन सर्व्हिस UAN/Online Service (OCS/OTCP) वर क्लिक करावे लागेल.
आता आपल्याला 12 अंकी णअछ नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करावे लागेल. खात्यात लॉगिन केल्यानंतर मॅनेज टॅबवर क्लिक करून केवायसीवर क्लिक करावे लागेल.
आता नवीन पेज समोर येईल. या ठिकाणी बँक, पॅन, पासपोर्टचे ऑप्शन दिसू लागेल. या ठिकाणी बँकवर क्लिक करावे लागेल.
आपल्याला खाते क्रमांक, नवीन आयएफएससी कोड टाकावा लागेल. त्यानंतर स्क्रिनवर बँकेच्या नवीन शाखेचे विवरण दिसेल. त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे लागेल.
सेव्हवर क्लिक केल्यानंतर आयएफएससी कोडचे विवरण व्हेरिफाय होईल. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ईपीएफओ खात्यात नवीन बँकेच्या शाखेचा आयएफएससी कोड अपडेट होईल.
राधिका बिवलकर