Stock Market Today | शेअर बाजाराची स्थिर सुरुवात, सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ | पुढारी

Stock Market Today | शेअर बाजाराची स्थिर सुरुवात, सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिल्याने जागतिक संकेत मजबूत आहेत. दरम्यान, आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील (Stock Market Today) सेन्सेक्स, निफ्टी स्थिर पातळीवर खुले झाले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीमध्ये चढ- उतार दिसून आला. सकाळी साडेनऊच्या सुमारास सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ६१,८०० वर तर निफ्टी ४२ अंकांच्या वाढीसह १८,३०० वर व्यवहार करत होता.

जपानचा निक्की निर्देशांकाने स्थिर पातळीवर व्यवहार केला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ३.७ टक्क्यांनी वाढला आहे. शांघाय कंपोझिटने ०.५१ टक्क्यांने वधारला. नॅस्डॅक १.८८ टक्क्यांनी वाढला, तर डाउ जोन्स इंडस्ट्रियल एवरेजने (Dow Jones Industrial Average) ०.१० टक्क्यांनी वाढून व्यवहार केला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.४४ टक्के म्हणजचे ८.६४ अंकांनी खाली येऊन १,९६९ वर होता. अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी असतानाही टोकियोच्या समभागांनी सोमवारी कमी व्यवहार केला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३,९५८ कोटी रुपयांचे शेअर्स आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६१६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button