Stock Market Updates | सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २३४ अंकांनी वाढून ६१,१८५ वर बंद | पुढारी

Stock Market Updates | सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २३४ अंकांनी वाढून ६१,१८५ वर बंद

Stock Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.७) आशियाई शेअर्स वधारले. या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. त्यानंतर बाजार बंद होताना ही तेजी कायम राहिली. बाजार खुला होताच सेन्सेक्स ४२० अंकांनी वाढून ६१,३०० वर गेला होता. तर निफ्टी ६४ अंकांनी वधारून १८,१०० वर पोहोचला होता. त्यानंतर सेन्सेक्स २३४ अंकांच्या वाढीसह ६१,१८५ वर बंद झाला. तर निफ्टी ८५ अंकांनी वाढून १८,२०२ वर बंद झाला.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ८.४३ टक्क्यांची वाढ

निफ्टीवर ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा शेअर सर्वाधिक ८.४३ टक्क्यांनी वाढून ४,१२५ रुपयांवर बंद झाला. एसबीआय, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि आयशर मोटर्स या कंपन्यांचे शेअर्सही वधारले. याउलट दिवीज लॅब, एशियन पेंट्स, सिप्ला, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स टॉप लुजर्स ठरले. बीएसईवर २,०५८ शेअर्स वाढले तर १,४९९ शेअर्स घसरले. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (m-cap) २८४.७६ लाख कोटीवर पोहोचले आहे. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४५ पैशांनी वाढून ८१.९० वर बंद झाला.

तसेच तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली आहे. चीनने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कडक प्रतिबंधक उपाय कायम ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्च्या तेलाच्या किमती २ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत.

जागतिक संकेत सकारात्मक

अमेरिकेचा रोजगार डेटा आणि चीनमध्ये आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू होण्याच्या आशेवर जागतिक संकेत सकारात्मक झाले आहेत. यामुळे टोकियोचे शेअर्स सोमवारी उच्च पातळीवर खुले झाले होते. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक ०.६६ टक्के म्हणजेच १७८ अंकांनी वाढून २७,३७८ वर तर टॉपिक्स निर्देशांक १४ अंकांनी वधारुन १,९२९ वर पोहोचला. सिंगापूर एक्स्चेंजवर निफ्टी फ्यूचर्स ७४ अंक म्हणजेच ०.४१ टक्क्यांनी वाढून १८,२७७ वर गेला आहे.

हे ही वाचा :

Back to top button