शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरूच : महेश तपासे

महेश तपासे
महेश तपासे
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील एक – एक प्रकल्प राज्याबाहेर जात असून ते थांबवण्यात शिंदे- फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे – फडणवीस सरकारला काहीच करता येत नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवल्यानंतर आता आणखी एक ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला असून महेश तपासे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर एक – एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्कड्रग पार्क आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा देखील प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. हे सर्व प्रकल्प थांबवण्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यात रोजगार कसा निर्माण करणार याचे उत्तर मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांच्याकडे सध्यातरी नाही. राज्याला औद्योगिक विकास वाटेवर कसे आणणार आणि नवीन प्रकल्प राज्याबाहेर का गेला? याचेही उत्तर शिंदे – फडणवीस यांनी जनतेला द्यायला हवे, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news