परभणी, हिंगोलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत | पुढारी

परभणी, हिंगोलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत

सोनपेठ: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात देगलूर येथे आली होती. ही भारत जोडो यात्रा आज (दि. १२) दुपारी हिंगोली जिल्ह्यात आली. पार्डी फाटा ते कळनुरी या ठिकाणी उभारलेल्या भव्य प्रवेशद्वारावर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, आमदार प्रज्ञाताई सातव, वर्षा गायकवाड, अमर राजूरकर, माजी आमदार भाऊराव पाटील, यांच्यासह परभणी हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसने पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परभणी हिंगोलीसह जवळपासच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या जनतेने या यात्रेचे उस्फूर्तपणे भव्य स्वागत केले.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, सुमीत पवार, मुंजा धोंडगे, जगन्नाथ कोलते, सुदर्शन कदम, राजू सौदागर यांच्या पुढाकारातून सहभाग घेतला. या ठिकाणाहून चालत असताना रस्त्याच्या दुतर्फा गर्दीसह हजारो लोकांनी या यात्रेत सहभाग घेतला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button