मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (Comptroller and Auditor General of India) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. ही मागणी कॅगने मान्य केली आहे. मुंबई महापालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप याची आता कॅग चौकशी करणार आहे.
कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. या आरोपातील सत्यता जनतेसमोर यावी, यासाठी लवकरात लवकर कॅगमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करावे, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. त्याला मान्यता मिळाली असून, आता कॅगकडून मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होणार आहे.
हेही वाचा :