धक्‍कादायक : अंबाजोगाईत आईच्या डोळ्यादेखत दरीत उडी मारून युवकाने जीवन संपवले | पुढारी

धक्‍कादायक : अंबाजोगाईत आईच्या डोळ्यादेखत दरीत उडी मारून युवकाने जीवन संपवले

अंबाजोगाई : पुढारी वृत्‍तसेवा –अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून (२० वर्षीय) युवकाने आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे या मृत युवकाचे नाव आहे.

नरेश ज्ञानोबा लोमटे हे पंधरा वर्षापासुन मनोरुग्नतेमुळे आजारी होते. आजारपणातच त्यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले होते. वडीलांचे निधन झाल्यानंतर बहिणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वडीलांच्या निधनामुळे दिनेशने हाताची नस कापुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

आज सकाळी तो घरातून पळत सुटला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले पत्रकार अशोक दळवे, महेश लोमटे, कुनाल लोमटे, सय्यद राजा सय्यद पाशा, पो कॉ कांदे यांनी त्याला आडवून समजवण्या प्रयत्न केला. परंतु यांना हुलकावणी देत मुकुंदराज परीसरातील मोर पाँईटवरुन त्‍याने उडी घेत आपले जीवन संपवले. आईच्या आरडा ओरडीमुळे नागरीक जमा झाले.

हेही वाचा :  

Back to top button