Mumbai Rape case : साकीनाकामधील निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली | पुढारी

Mumbai Rape case : साकीनाकामधील निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा (Mumbai Rape case) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या निर्भयाची अखेर मृत्यूशी झुंज संपलीय. त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. (Mumbai Rape case) हा अमानवीय प्रकार समोर आल्यानंतर मुंबई हादरली आहे.

नितेश राणे यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, ‘योजना बंद झाली, मग याचे श्रेय कुणाला द्यायचे?’

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…

या घटनेवरुन भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना ऐकून नि:शब्द झाले. कायद्याची भीती राहिलेली नाही. सहनशीलतेचा अंत बघू नका. महिलांवर असे अत्याचार होतात, आम्ही गप्प बसायचं, अशा शब्दांत निर्भयाच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शक्ती कायदा आणणार होते, त्याचं काय झालं? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Tarapur Midc fire : तारापूर एमआयडीसीतील रंग रसायन कंपनीला आग

लालबागच्या राजाचे उत्साहात स्वागत…

रक्ताच्या थारोळ्यात पडली होती महिला

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एक ३० वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशी माहिती पोलिस कंट्रोल रुमला मिळाली होती.

माशासारखा कपडे घातलेल्या प्रियांका चोप्राच्या ड्रेसचं उघडलं बटण आणि…

Gehana Vassisth : दिखाना भी नहीं आता छुपाना भी नहीं आता! गहनाच्या न्यूड फोटोनं धुमाकूळ

साकीनाका येथे खैराना रोडवर महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन पोलिसांना आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी महिलेची स्थिती गंभीर होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती.

साकीनाका येथील घटनेमुळे नराधमांच्या विकृतीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झालीय. वारंवार सांगूनदेखील राज्य सरकारकडून दिशा कायद्याच्या अंमलबजावणीला विलंब करण्यात आला. त्यामुळे सरकारला विनंती आहे किमान आता तरी जागे व्हा, या नराधमांवर कारवाई करा आणि फाशीची शिक्षा द्या.
– आमदार प्रसाद लाड.

Back to top button