Railway platform ticket : रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाताय, काढावे लागेल ५० रुपयाचे तिकीट, पश्चिम रेल्वेचा निर्णय

Railway platform ticket : रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाताय, काढावे लागेल ५० रुपयाचे तिकीट, पश्चिम रेल्वेचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : दिवाळी सणाच्या काळात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे परिसर आणि प्लॅटफॉर्मवरील  प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मध्यरेल्वेच्या काही स्थानकांच्या प्लॅटफॉर्म दरात वाढ केली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दरांमध्ये ४० रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच मुंबई मध्यविभागातील काही नामांकित स्थानकांवर ३१ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्मसाठी ५० रुपये द्यावे लागणार असल्याचे, रेल्वे विभागाने सांगितले आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढविण्यात आलेल्या मुंबई मध्य विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत अशा काही नामांकित स्थानकांचा समावेश असल्याची माहिती पश्चिम रेल्वे विभागाने दिली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news