पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला; राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला | पुढारी

पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला; राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला

पुढारी ऑनलाईन : पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी आता २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढल्याने त्यांची दिवाळी जेलमध्येच होणार असल्याची शक्यता वाढली आहे.

संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. राऊत यांची जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी ही आज एकाचवेळी झाली. याप्रकरणी ते PMLA न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. पण न्यायालयाने राऊंतांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता त्यांच्या कोठडीत आणखी वाढ केली.

संजय राऊत आणि खडसेंची भेट

मुंबई सत्र न्यायालयात लिफ्टजवळ संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. खडसेंनी आस्थेवाईकपणे राऊंतांची चौकशी केली असता, ‘संगळं ठिक, चिंता नको, लवकर बाहेर येईन,’ असा विश्वास संजय राऊत यांनी खडसेंना दिला. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ औपचारिक चर्चा झाल्या असल्याचे ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button