सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सुकेश चंद्रशेखरची याचिका | पुढारी

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सुकेश चंद्रशेखरची याचिका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील उच्चभ्रू लोकांची फसवणूक करण्याच्या आरोपखाली तुरूंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरला सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. दिल्लीतील मंडोली तुरूंगातून दुसऱ्या तुरूंगात स्थानांतरित करण्याची मागणी करणारी सुकेशची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

२३ ऑगस्ट रोजीच न्यायालयाने सुकेश तसेच त्याची पत्नी लीना पॉलोजला दिल्लीतील तिहाड तुरूंगातून मंडोली तुरूंगात स्थानांतरित करण्याचे आदेश दिले होते. तिहाड तुरूंगात जीवाला धोका असल्याची भीती सुकेशने व्यक्त केली होती. पंरतु, पुन्हा सुकेशने मंडोली तुरूंगातुन दुसऱ्या तुरूंगात हलवण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळाल्याने सुकेशला मंडोली तुरूंगातच राहावे लागणार आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने (सीबीआय) सुकेश विरोधात ७ ऑक्टोबरला आरोपपत्र दाखल केले आहे. खोट्या फोन नंबरवरुन खंडणी वसूल केल्याचा आरोप सुकेशवर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने सुकेश तसेच संजय जैन उर्फ संजय चिकन विरोधात तामिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्याचे सीजेएम चेंगलपट्ट यांच्या समक्ष आरोपपत्र दाखल केले आहे. मे २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे एक गुन्हा दाखल केला होता. तसेच २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button