Stock Market Today | आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स ६५० अंकांनी तेजीत | पुढारी

Stock Market Today | आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स ६५० अंकांनी तेजीत

Stock Market Today : आशियाई बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला आहे. आज मंगळवारी (दि.१८) सकाळी सेन्सेक्स सुमारे ५५० अंकांनी वाढून ५८,९०० वर खुला झाला. तर निफ्टी सुमारे १५० अंकांनी वाढून १७,४०० वर होता. दरम्यान, सेन्सेक्सची तेजी ६५० अंकांच्या वर आणि निफ्टीची तेजी १८० अंकांच्या वर जाताना दिसत आहे. एकूणच बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे.

आशियातील बाजारांत तेजी

ब्रिटनच्या वित्तीय धोरणातील नाट्यमय यू-टर्नने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक तयार झाले आहे. यामुळे आशियातील समभागांनी मंगळवारी उच्चांक गाठला. तर अमेरिकी डॉलर निचांकी पातळीवर गेला आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.४३ टक्क्यांनी वाढला, तर जपानचा Nikkei ०.६ टक्क्यांनी वधारला आहे. S&P 500 फ्यूचर्स आणि Nasdaq फ्यूचर्स दोन्ही ०.८ टक्क्यांनी वाढले आहेत. (Stock Market Today) टोकियोचे शेअर्स मंगळवारी वधारल्याचे दिसून आले. बेंचमार्क Nikkei 225 निर्देशांक १.५४ टक्के म्हणजे ४१३.५६ अंकांनी वाढून २७,१८९.३५ वर होता. तर Topix निर्देशांक १.२९ टक्के म्हणजेच २४.२५ अंकांनी वाढून १,९०३.८१ वर होता. (Stock Market Today)

दरम्यान, अमेरिकी डॉलर कमजोर झाल्याने मंगळवारच्या सुरुवातीच्या आशियाई व्यापारात तेलाच्या किमती स्थिर होत्या.

सोमवारी सेन्सेक्स ४९१ अंकांनी वधारून ५८,४१० वर बंद झाला होता. तर निफ्टी १२६ अंकांनी वाढून १७,३११ वर बंद झाला होता. बीएसईवर सुमारे १,५३० शेअर्स वाढले तर १,८६५ शेअर्स घसरले होते. बजाज ऑटो, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये होते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स सोमवारच्या व्यवहारात २ टक्क्यांहून अधिक वधारले होते.

हे ही वाचा :

Back to top button