Share Market Updates | घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स ४९१ अंकांनी वाढून ५८,४१० वर बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

Share Market Updates : कमकुवत जागतिक संकेतामुळे सोमवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारही घसरणीसह सकाळी खुला झाला होता. पण त्यानंतर बाजाराने नुकसान टाळत तेजी घेतली. सेन्सेक्स ४९१ अंकांनी वधारून ५८,४१० वर बंद झाला. तर निफ्टी १२६ अंकांनी वाढून १७,३११ वर बंद झाला. बीएसईवर सुमारे १,५३० शेअर्स वाढले तर १,८६५ शेअर्स घसरले. बजाज ऑटो, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये दिसले.

आज सोमवारी (दि.१७) सकाळी सेन्सेक्स १३० अंकांनी घसरून ५७,७०० वर खुला झाला होता. तर निफ्टी १७,१०० वर खुला झाला होता. त्यानंतर सेन्सेक्स, निफ्टीची घसरण थांबून तो वधारला. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स २७१ अंकांनी वाढून ५८, १९१ वर गेला. तर निफ्टी १७,२०० वर होता. त्यानंतर ही तेजी वाढत गेली.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आणखी व्याज दरवाढीच्या शक्यतेने अमेरिकेतील प्रमुख वॉल स्ट्रीट निर्देशांकांची कामगिरी खालावली आहे. याचे पडसाद आशियाई शेअर बाजारात दिसून येत आहेत. (Share Market Updates ) दरम्यान, भारतीय शेअर बाजार यातून सावरत तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

बँकिंग आणि आयटी शेअर्संमधील तेजीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता. सेन्सेक्स ६८४ अंकांनी वाढून ५७,९१९ वर बंद झाला होता. तर निफ्टी १७१ अंकांनी वधारुन १७,१८५ वर बंद झाला होता. BSE वर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांक अनुक्रमे ३१ अंकांनी घसरले आणि २.३० अंकांनी वाढले होते. बँकिंग आणि आयटी शेअर्स BSE वर अनुक्रमे ७५४ अंकांनी आणि ४५९ अंकांनी वाढले होते.

शुक्रवारी सेन्सेक्स वधारल्याने गुंतवणूकादारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा झाला होता. यामुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६९.८५ लाख कोटींवरुन २७३.२३ लाख कोटींवर पोहोचले होते. सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक ३.९५ टक्क्यांनी ‍वधारले. तर इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग हिरव्या रंगात गेले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news