

मुंबईतील इमारतीमधील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सीलबंद इमारतीची संख्याही पुन्हा वाढत आहे. १५ ऑगस्टला संपूर्ण मुंबई शहरामध्ये अवघ्या २६ इमारती सील होत्या. ही संख्या आता ४९ वर पोहचली आहे. यात सर्वाधिक सील बिल्डिंग बांद्रा पश्चिम, खार, परळ, शिवडी, लालबाग सायन आदी भागात आहेत.
मुंबईत झोपडपट्टी व दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी, इमारतीमधील कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत.
आतापर्यंत ६६ हजार १६४ इमारती सीलमधून मुक्त झाल्या आहेत.
१५ ऑगस्टपर्यंत सीलबंद इमारतींची संख्या अवघी २६ होती. मात्र आता ही संख्या ४९ वर पोहचली आहे.
हेही वाचलं का?