संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ | पुढारी

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायलयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने राऊत यांना जून महिन्यात अटक केली होती.

दरम्यान, न्यायालयात हजर करण्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत म्हणाले, नवीन चिन्हच  शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. यापूर्वीही अनेक पक्षांची चिन्हे गोठवण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस पक्षाचे तीन वेळेस चिन्ह गोठवण्यात आले होते.

हेही वाचंलत का?

Back to top button